Ad will apear here
Next
एम. के. रणजित सिंह यांना वसुंधरा सन्मान

पुणे : १२व्या ‘किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवा’चे उद्घाटन सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस. नल्लामुथ्थु यांच्या हस्ते चार जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. या समारंभात अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते ‘किर्लोस्कर वसुंधरा मित्र’ पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. 

किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या महोत्सवाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र वनविभाग यांच्यासह अन्य संस्था व महाविद्यालयांचे सहकार्य लाभले आहे. 

महोत्सवानिमित्त बालगंधर्व कलादालनात छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन पाच जानेवारी रोजी बंगळुरु येथील नामवंत छायाचित्रकार गणेश शंकर यांच्या हस्ते होईल. या वेळी त्यांचे ‘माय एन्काउंटर विथ कॅमेरा’ हे विशेष दृक् श्राव्य सादरीकरण होणार आहे.

इको बझारचे उद्घाटन पाच जानेवारी रोजी डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते व गौरी किर्लोस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत घोले रस्त्यावरील पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन इथे होणार आहे. 

एम. के. रणजित सिंह‘ग्रीन कॉलेज, क्लीन कॉलेज’ स्पर्धेचा बक्षीस समारंभ सात जानेवारी रोजी पंडीत जवाहरलाल नेहरु सभागृह, घोले रस्ता इथे अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते आणि डॉ. विजय भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.   

महोत्सवाच्या सांगता समारंभात विविध पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. ‘वसुंधरा सन्मान’ वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या एम. के. रणजित सिंह यांना दिला जाणार आहे. आरती कुलकर्णी यांना 'इको जर्नालिस्ट' पुरस्कार तर डॉ. दीपक आपटे यांना 'ग्रीन टीचर' पुरस्कार देण्यात येईल. 

(या महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZYHBK
Similar Posts
पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सर्वांची पुणे : ‘पर्यावरण संवर्धन करताना काही विशिष्ट घटकांकडेच लक्ष दिलं जातं, आपण वाघाच्या संवर्धनाबाबत गंभीर असतो, पण त्याच वेळेला माळढोक, रानम्हशी यासह जंगल आणि सागरामधील अनेक वनस्पती, जीव नष्ट होत आहेत याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. निसर्गातील सर्व घटकांचं संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं,’ असे
इको क्विझ व पथनाट्य स्पर्धा पुणे : ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’अंतर्गत घेण्यात आलेल्या इको क्विझ आणि पथनाट्य स्पर्धेचे निकाल बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या सांगता समारंभात जाहीर करण्यात आले. इको क्विझ स्पर्धेत फर्ग्युसन महाविद्यालय, तर पथनाट्य स्पर्धेत एच. व्ही. देसाई महाविद्यालय विजेते ठरले. सांगता समारंभाचे अध्यक्ष आर
सांगरूण गावात सरपंच परिषद पुणे : ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’अंतर्गत आयोजित केलेल्या कृती कार्यक्रमात सात जानेवारी रोजी सांगरूण गावात सरपंच परिषद पार पडली. ‘या परिषदेत सांगरूण गावातल्या महिलांनी कापडी पिशव्यांचं उत्पादन करण्याचा निर्धार व्यक्त केला. यासाठी आवश्यक तो कच्चा माल कुडजे गावचे सरपंच समीर पायगुडे
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language